About Department (Political Science)


प्रेरणा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालय नरखेड नगरीतील एक लौकिक प्राप्त महाविद्यालय आहे. नरखेड शहरातील व ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय व्हावी त्यांचा सर्वंकष विकास व्हावा या उद्देशाने 1971 रोजी प्रेरणा एज्युकेशन सोसायटीने या महाविद्यालयाची स्थापना केली. लोकांचे आर्थिक मानसिक व शैक्षणिक स्थिती पूर्णतः विस्कटलेली असताना या सर्व बिकट परिस्थितीला तोंड देत असतानाच प्रेरणा एज्युकेशन सोसायटीने एक धाडसी निर्णय घेऊन लोक कल्याणाचे उद्देशाने पदवी महाविद्यालय सुरू केले.

महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच 1971 पासूनच या महाविद्यालयात राज्यशास्त्र विषय सुरू करण्यात आला 1972 मध्ये बी.ए .प्रथम वर्षाला वर्गात विद्यार्थ्यांची संख्या केवळ 57 होती नंतर त्यात सातत्याने वाढ होत गेली महाविद्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक विकासाबरोबर राज्यशास्त्र विभागाचा देखील दोन्ही दृष्टीने प्रगती झाली. राज्यशास्त्र विभाग महाविद्यालयातील कृतीशील गौरवशाली विभाग आहे महाविद्यालयाच्या स्थापनेपासून डॉ.वसंत उमरकर हे राज्यशास्त्र विभाग प्रमुख पदावर 1974 ते 2008 पर्यंत कार्यरत होते. 2016 पर्यंत प्राध्यापक पवन महंत यांनी तासिका तत्वावर या विभागाची धुरा सांभाळली. 26 ऑक्टोबर 2016 पासून राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून सहाय्यक प्राध्यापक पवन महंत पूर्णवेळ कार्यरत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक तसेच कर्मचारी कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्यातून प्रयत्नातून राज्यशास्त्र विभागाला गती प्राप्त झाली त्यांच्या प्रयत्नातून मार्गदर्शनातून या विषयाची प्रगती उत्तरोत्तर होत आहे.

राज्यशास्त्र विभागाचा शैक्षणिक आलेख सातत्याने उंचावत आहे या विभागांतर्गत अभ्यास मंडळ कार्यरत असून त्या माध्यमातून अभ्यासक्रमाला पूरक राज्यशास्त्रीय दृष्ट्या उपयुक्त संशोधन प्रकल्प, सेमिनार, राज्यशास्त्र ज्ञान वाढेल अशा विषयावरील निबंध स्पर्धा, हिवाळी अधिवेशनावर चर्चासत्र आयोजित केले जातात. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात राज्यशास्त्र विषयाची 1200 वर पाठ्यपुस्तके उपलब्ध असून संबंधित पुस्तके तसेच संदर्भ ग्रंथ 500 च्या आसपास उपलब्ध आहे त्यात सातत्याने भर पडत असते. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित विविध मासिक व नियतकालिके नियमित ग्रंथालयात येतात त्यामध्ये लोकराज्य, योजना , पॉलिटिकल विकली इत्यादी. या सर्वांचा विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यास लाभ होतो.

Name Prof. Pawan D. Mahant
Designation Head & Asso. Professor
Qualification M.A., NET
Experience U.G.- 06 Years
Area of Research Indian politics & Government
Mobile No. 9881135542
Email Id. pawanmahant3@gmail.com
Bio-data View-Profile