श्री पंढरीनाथ कला व वाणिज्य महाविद्यालय नरखेड तालुक्यात सन 1971 मध्ये ग्रामिण भागात ग्रामिण विध्यार्थांच्या शैक्षणिक विकासासाठी सुरु झाले. श्री पंढरीनाथ महाविद्यालयाने कला शाखेत इतिहास विषयाचे महत्व लक्षात घेवून निवड केली आहे. या विभागात सुरुवातीला प्रा.डॉ. कुर्वे यांनी उत्तमरित्या अध्यापनाचे कार्य केले असून विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाविषयी आवड तयार केली. तेंव्हापासून महाविद्यालयात ऐच्छिक विषय असूनही इतिहास विषय निवडणाऱ्या विद्याथ्र्याची संख्या महाविद्यालयात मोठया प्रमाणात असते. प्रा.डॉ. कुर्वे आज संयुक्त राष्ट्रसंघात जागतिक शांतता व सामनजस्य या विभागात जगात कार्य करतात. याच विभागात प्राचार्य डॉ. जयंत जवंजाळ यांची सन 1994 मध्ये नियुक्ती झाली असून त्यांनी सुद्धा उत्तम कार्य केले. त्यानंतर सन 2007 मध्ये त्यांची नियुक्ती याच महाविद्यालयात प्राचार्य पदावर झाली असून ते महाविद्यालयात कार्यरत आहे.
सन 2009 मध्ये प्रा.डॉ. सुधाकर नारायणराव पवार नियुक्त झाले असून ते आजपर्यंत महाविद्यालयात इतिहास विषयाचे अध्यापकाचे कार्य करतात. सन 2013 मध्ये महाविद्यालयात "वैदर्भिय महिलांचे स्वातंत्र्यं आंदोलनात व सामाजिक कार्यात योगदान" या विशयावर राज्यस्तरीय चर्चासत्र सुध्दा पार पडले आहे. आज या विभागात बी.ए.प्रथम वर्ष 97, बी.ए.द्वितीय वर्ष 89 व बी.ए.तृतीय वर्ष 63 इतकी विद्यार्थी संख्या असून विद्याथ्र्यामध्ये इतिहास विषयाचे आकर्षण कायम आहे.
धन्यवाद !
Name | Dr. Sudhakar N. Pawar |
---|---|
Designation | Asst. Professor & Head |
Qualification | M.A., Ph.D. |
Experience | U.G.- 29 Years |
Area of Research | Social History |
Mobile No. | 9960395928 |
Email Id. | Pawarsudhakar203@gmail.com |
Bio-data | View-Profile |