About Department (Marathi)


श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना १९७१ या वर्षी झाली. तेव्हापासून महाविद्यालयाच्या मराठी विभागाला अभ्यासू,विद्यार्थीप्रिय,संशोधक म्हणून ओळख असलेल्या प्राध्यापकांची परंपरा लाभलेली आहे. सुरुवातीला प्रा. ज्ञा. ह. बोंडे यांनी सुमारे वीस वर्षे मराठी विभागप्रमुखाची धुरा सांभाळली. खऱ्या अर्थाने त्यांच्याच कार्यकाळात महाविद्यालय स्थिरस्थावर झाले व महाविद्यालयाचा लौकिक वाढला. पुढे सौ. बोंडे यांची मराठी विभागात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या बोंडे दाम्पत्याने महाविद्यालयाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला.

पुढे १९९४ या वर्षी प्रा. डॉ. अजय चिकटे यांनी मराठी विभागाची धुरा सांभाळली. आपल्या कुशल कार्यपद्धतीने आणि अभ्यासू वृत्तीमुळे लवकरच त्यांनी मराठी विभागाला अधिक कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत अनेक वांगमयीन कार्यक्रम महाविद्यालयाला अनुभवता आले. जनसाहित्य संमेलन, विदर्भ साहित्य संघाचे ५६ वे साहित्य संमेलन, मराठी प्राध्यापक परिषदेचे अधिवेश अशा अनेक उपक्रमामुळे महाविद्यालयाचा लौकिक वृद्धींगत होत राहिला. २००७ या वर्षी डॉ. विजय राऊत मराठी विभागात रुजू झाले. सध्या डॉ. विजय राऊत हे सहयोगी प्राध्यापक म्हणून मराठी विभागात कार्यरत आहेत.

Name Dr. Vijay R. Raut
Designation Head & Asso. Professor
Qualification M.A., M.Phil., Ph.D. NET
Experience U.G.- 15 Years
Area of Research Gramin Sahitya
Mobile No. 9850236879
Email Id. parambiraut@gmail.com
Bio-data View-Profile